नाशिक : यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात अति पावसाने (Heavy Rain) शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच नाशिक (Nashik) जिल्ह्यतील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून कसमादे भागातील मका पीकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास हजार एकर क्षेत्राच्या पेक्षा जास्त मका पिकाचे (Maize) उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी अतीवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात मका पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही मुळे सडून गेली आहे तर काही ठिकाणी मक्याची वाढच खुंटून गेली आहे. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून उत्पादन घटणार असा अंदाज बांधला जात आहे. यामुळे मात्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मक्याचे मोठे नुकसान झालेले असल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होणार आहे.
पोल्ट्री व्यवसाय करत असतांना कोंबडीला लागणारे खाद्य तयार करतांना मक्याची आवश्यकता भासत असते.
अतिवृष्टी झाल्याने मक्याचे उत्पादन घटल्याने दरात वाढ होई शकते आणि त्यामुळे कोंबडीचे खाद्य देखील महाग होणार आहे.
कोंबडीचे खाद्य महाग झाल्याने कोंबडीच्या विक्री दरात देखील फरक जाणवणार आहे. त्यामुळे चिकनचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान मक्याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी कसमादे परिसरातील शेतकरी करीत आहे.
त्यातच पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना मक्याच्या उत्पादनाचा फटका बसणार असून अधिकच्या दरात मका खरेदी करावी लागणार असून परिणामी जास्त दरात कोंबडीच्या दरात वाढ होणार आहे.