नाशिक : शेतकऱ्यांना वन हक्काच्या जमिनी मिळाव्या या मागणीसह अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च निघाला होता. या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपल्या शेतीसाठी सहभागी झाले होते.त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मावडीमधील पुंडलिक जाधवही लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते.मुंबईला धडकणाऱ्या या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चमधील पुंडलिक जाधव यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यामुळे आता जाधव कुटुंबीयांसह मावडी गावावर शोककळा पसरली आहे.
त्यामुळे आता तरी या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी होणार की नाही असा सवाल आता लाँग मार्चमधील शेतकरी करू लागले आहे.
शेतकरी लाँग मार्चमधील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मावडी गावावर शोककळा पसरली आहे. पुंडलिक जाधव जमीन नावावर करावी अशी त्यांची मागणी होती. या मागणीसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठ नाशिक जिल्ह्यातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. मात्र पुंडलिक जाधव यांच्या मृत्यूमुळे आता लाँग मार्चमधील शेतकरी दुःखी झाले आहेत.
पुंडलिक जाधव यांच्या लाँग मार्चमध्ये सहभागी असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे आता तरी शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पुंडलिक जाधव यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबीय आता दुःख सागरात लोटले आहे. घरातील आधार गेल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांची झाली आहे. त्यामुळे शासनाने आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी मावडी ग्रामस्थांसह त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
राज्यातील शेतकरी सध्या प्रचं अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही तर दुसरीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने आतातरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.