VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 08, 2021 | 4:26 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. गेल्या पाच तासांपासून ही चौकशी सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे. (NCP leader Eknath Khadse)

VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?
devendra fadnavis
Follow us on

नाशिक: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. गेल्या पाच तासांपासून ही चौकशी सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. (devendra fadnavis reaction on NCP leader Eknath Khadse who appears before ED )

देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपने सुडापोटी आपल्यावर कारवाई सुरू केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्याकडे फडणवीस यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.

युती होणार का?

नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतलं आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

खडसेंचा थेट भाजपवर आरोप

ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.

किती चौकश्या करणार?

ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल खडसे यांनी केला. (devendra fadnavis reaction on NCP leader Eknath Khadse who appears before ED )

संबंधित बातम्या:

माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास; एकनाथ खडसेंचा भाजपवर थेट आरोप

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, पण त्यांची उंची मोठी, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले

(devendra fadnavis reaction on NCP leader Eknath Khadse who appears before ED)