नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज नाशिकमध्ये होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आज खूप आनंद होतोय. पिंग अँड ब्ल्यू स्कूलचं उद्घाटन केलेलं आहे. शंभर दिवसात ही खूप चांगली शाळा निर्माण झाली आहे. लहान मुलं हे आनंद देतात. लहान मुलं हे भविष्य आहेत. त्यांचं संगोपन निट करणं गरजेचं आहे. आई, वडील, शाळांची यात महत्त्वाची भूमिका असते.
मुलं गेम जास्त खेळतात, हे खरं आहे. पण, त्यांचे हे दिवस अभ्यासाचे आहेत. बाहेर जाऊन खेळले पाहिजेत. त्यांना समजावू शकतो. मुलांना क्वालिटी वेळ द्यावा लागेल. सरकारी शाळांमध्ये बदल होणं आवश्यक आहे. खासगी संस्था मदत करतात. राज्याचं शिक्षण खासगी शाळांच्या स्तरावर आणणं आवश्यक आहे. कशाप्रकारे शिकवितात, हे अवलंबून असल्याचंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, राज्यात आता आधीसारखं गुंडाराज राहिला नाही. सुसंस्कृतपणे तक्रार केली पाहिजे. आपण गुंडागर्दी करू शकत नाही.
विनयभंगाची गोष्ट संबंधित महिलेला चांगलं माहिती आहे. याबाबत संबंधित महिलेला विचारावं लागेल. त्या महिलेनं गुन्हा का दाखल केला. इथं बसून त्या महिलेबाबत बोलू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ही महाविकास आघाडी सरकार नाही. त्यामुळं खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरणपोळी खाणं बंद केल्याचं एका कार्यक्रमात सांगितलं. यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, हो त्यांनी पुरणपोळी खाणं बंद केली आहे. आता ते मोदक खातात. डॉक चॉकलेट खातात. आता पुरणपोळी देणं लोकांनी बंद केलं असेल, म्हणून पुरणपोळी खातं नसतील, असंही अमृता फडणवीस यांनी हसतहसत सांगितलं.