नाशिकः दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हनुमान चालिच्या नावाने दंगा करण्यात आला. एप्रो क्रिएट ॲक्शन म्हणून पोलिसांनी अटक केली. काल रात्री जी घटना घडली, त्या संदर्भात देखील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कारवाई करतील. कालची घटना दुर्दैवी, पण सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा सहकार्य करावे. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. त्यांना त्यांचे काम माहिती आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी केले. ते नाशिकमध्ये (Nashik) आले असता बोलत होते. वळसे-पाटील म्हणाले की, राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली असे काही दिसत नाही. अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दगडफेक झाली हे खरं आहे. मात्र, कोणाकडून झाली, कोणी केली याचा तपास सुरू आहे. यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे. दगडफेकसंदर्भात पोलीस योग्य ती कारवाई करतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
किरीट सोमय्या यांच्यावर काल प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलिस स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावे लागले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होते. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा खुसल्या. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वळसे-पाटील म्हणाले. शिवाय नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्री यांच्या आश्रमावरही दगडफेक झाली आहे.
नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा पार पडतोय. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित आहेत. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस यांचे अभिनंदन. आपण सेवा बजावण्यासाठी सज्ज झालात त्याबद्दल शुभेच्छा. सर्व कुटुंबीयांचे देखील अभिनंदन. महाराष्ट्र पोलीस दलाला गौरवशाली इतिहास आहे. गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा सर्वोच्च ठेवा. पोलीस दलाच्या सक्षमीकरणसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांना विनंती की नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!