खुर्च्या फेकल्या, प्रचंड हुल्लडबाजी, अखेर पोलीस आक्रमक, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 05, 2023 | 12:03 AM

डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या नाशिक येथील कार्यक्रमात गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने हा गोंधळ झाला.

खुर्च्या फेकल्या, प्रचंड हुल्लडबाजी, अखेर पोलीस आक्रमक, गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Follow us on

नाशिक : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या नाशिक येथील कार्यक्रमात गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने हा गोंधळ झाला. विशेष म्हणजे काही प्रेक्षकांनी कार्यक्रम सुरु असताना खुर्च्या फेकल्या. यावेळी होणारा गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून सुरक्षेची काळजी घेतली जाते. पण तरीही पुन्हा तसाच काहीसा प्रकार समोर आलाय.

गौतमी पाटील ही आज नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे आली. रायगड ग्रुपच्या वतीने गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला. गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे आज निफाडमध्ये तोबा गर्दी होण्याची आधीच शक्यता आहे. याशिवाय या कार्यक्रमात गोंधळ उडण्याची देखील भीती होती. अखेर ज्याची भीती होती ते कार्यक्रमात पुन्हा घडताना दिसलं.

रायगड ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लावणी महोत्सव हा निफाड मार्केट यार्ड परिसरात होता. विशेष म्हणजे गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव पाहण्यासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता असल्याने तिकीटही ठेवण्यात आले होते. 200, 500 आणि एक हजार रुपये असा लावणीच्या तिकीटाचा दर ठरविण्यात आला होता. सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम सुरु होणार होता. निफाडमध्ये गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

नृत्यांगना गौतमी पाटील ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेली गौतमी आज निफाडला येणार असल्याने मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी सकाळपासूनच निफाडमध्ये दिसून आली. गौतमी पाटीलचा डान्स वादात अडकल्याने तिला अनेकांनी विरोध केलाय. तरीही तिच्या लोकप्रियतेत कुठलीही कमी झाली नाही. उलट वाढ होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमांची मागणी वाढत चालली आहे.