चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, नाशिक | 13 March 2024 : नाशिकच्या राजकीय आखाड्यात आता खरा कस आणि दम लागणार आहे. शांतिगिरी महाराज यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. पण बाबाजी भक्तगण परिवारातून महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या निर्णयानंतर नाशिक लोकसभा निवडणुकीत अधिक रंगत येणार आहे.
महाराज निर्णयावर ठाम
नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली. शिंदेंच्या घोषणे नंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. शांतिगिरी महाराज मविआ च्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराजांचा मोठा भक्त परिवार