आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल, पण…, किरण धराडे यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

| Updated on: Nov 14, 2022 | 4:10 PM

माझ्यासोबत आणखी चार नगरसेविका आहेत. त्यासुद्धा शिंदे गटात सहभागी व्हायला तयार आहेत.

आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल, पण..., किरण धराडे यांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र
Image Credit source: tv 9
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण धराडे-गामने यांनी उपरोधक पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलं आहे. किरण धराडे म्हणाल्या, मी ठाकरे गटाची नगरसेविका आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. त्यात असा उल्लेख केला की, संजय राऊत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात 72 तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळं मी पत्राद्वारे विनंती केली की, राऊत असोत की, आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आम्ही शिंदे गटात सामिल होण्यासाठी तयार आहोत.

मी स्वतः शिवाय माझ्यासोबत चार नगरसेविका या शिंदे गटात प्रवेश करतील. पण, तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका, असंही किरण धराडे म्हणाल्या. शिंदे गटाकडून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात. यासाठी आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. आमच्या नेत्यांवर निदान खोटे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.

शिंदे यांना त्यांची संघटना वाढविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, तर आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत. परंतु, आमच्या नेत्यांवर होणारे खोटे गु्न्हे आम्ही मान्य करणार नाही. ते गुन्हे तुम्ही मागे घ्या. आम्ही तुमच्या संघटनेत सहभागी होऊ, असा उपरोधित टोला नाशिक येथील नगरसेविकेनं लगावला आहे.

माझ्यासोबत आणखी चार नगरसेविका आहेत. त्यासुद्धा शिंदे गटात सहभागी व्हायला तयार आहेत. फक्त आमच्या नेत्यांवरील गुन्हे मागे घ्या, असंही किरण धराडे म्हणाल्यात. राज्यात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू होती. आता जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू आहेत. आज फक्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. उद्या आव्हाड, राऊत या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं.