दारात उभी राहून गारा पाहत होती चिमुकली, तिने कल्पनाही केली नसेल गारा पाहणे इतके महागात पडेल

| Updated on: Apr 12, 2023 | 12:10 AM

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दणाका दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

दारात उभी राहून गारा पाहत होती चिमुकली, तिने कल्पनाही केली नसेल गारा पाहणे इतके महागात पडेल
लग्नाहून घरी परतणाऱ्या कुटुंबावर वीज कोसळली
Follow us on

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्याचा शेतकऱ्यांनाही तोटा सहन करावा लागला आहे. अवकाळी पावसामुळे कलिंगड, कांदा, गहू, ज्वारी पिकांना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळेही अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. तर त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कसारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे.

कसारा परिसरात सध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला होता. तब्बल अर्धतासांहून अधिक काळ पाऊस पडत होता. याचं दरम्यान कसारा परिसरातील निगडवाडी येथील एका घराजवळच वीज कोसळली.

त्या विजेच्या धक्क्याने एक दहा वर्षीय मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलीचे नाव सोनाक्षी मारुती सावंत (वय 10)आहे.

ती दरवाजाच्या बाहेर उभी राहून गारांचा पाऊस बघत उभी होती. यावेळी घराजवळ विजेचा जोरदार आवाज आला, त्या आवाजावेळीच सोनाक्षीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले.

मात्र वीज नेमकी कुठे पडली हे अजून कुणालाही समजले नाही. वीज कोसळल्यानंतर सोनाक्षीला धक्का बसल्यानंतर तिने जोरदार आरडाओरड केला. मात्र काही मिनिटांनी ती बेशुद्ध पडली.

त्यानंतर तिला कुटुंबीयांनी तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दणका दिल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेली पिकं वाया गेल्याने शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आता तरी तात्काळ मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.