मालेगाव : कर्नाटक घटनेचे तीव्र पडसाद पहिल्या दिवसापासून मालेगावात उमटताना दिसले. हिजाबच्या समर्थनार्थ आज मालेगावात ‘हिजाब दिवस’ (Hijab Day) पाळण्यात आला. पोलिसांनी हिजाब दिवसाला परवानगी नाकारत शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे मालेगावातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते तर मध्य भागात शहराला छावणीचे स्वरुप दिसून आले. हिजाबच्या समर्थनार्थ जमेत ए उलमा (Jamet E Ulma)तर्फे मालेगावमध्येच आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्याचा फतवा काढण्यात आला होता. त्यासाठी गुरुवारी महिला मेळावा घेत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. महिला मेळाव्याला परवानगी नसताना देखील मेळावा घेण्यात आल्याने पोलिसांनी मौलानांसह आयोजकांविरुद्ध महिला मेळावा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याशिवाय राष्ट्रवादीतर्फे देखील आंदोलन करण्यात आल्याने त्या आंदोलनाच्या आयोजकांविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Hijab Day organized at Malegaon in Nashik in support of Hijab)
आज हिजाब दिवस’ पाळण्यात आला असला तरी या दिवशी प्रत्येक महिलेने घराबाहेर पडताना बुरखा, हिजाब परिधान करायचाच आहे, असा फतवा काढण्यात आला होता. मात्र कुठल्याही प्रकारचे आंदोलन, रॅली, निषेध मोर्चा अथवा सभा घेण्याचे जाहिर केले नव्हते. त्यामुळे ‘हिजाब दिवस’ असतानाही शहरातील दैनंदिन व्यवहार सुरुळीत सुरु होते. दरम्यान हिजाब मुस्लीम महिलांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करत असल्याचं विधान मौलाना मुक्ती यांच्यासह महापौर ताहेरा शेख यांनी केलं.
‘हिजाब दिवस’ पाळण्यात येणार असल्यामुळे आणि शहराची पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शहरात शिघ्र कृती दलाच्या जवानांसह एस.आर.पी.चे जवान देखी तैनात करण्यात आले होते. याशिवाय जिल्हाभरात पोलीस कुमक मागविण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मालेगावच्या पूर्व भागाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
या प्रकरणात घोषणाबाजी देणारी तरुणी अचानक प्रकाशझोतात आली असून या तरुणीला मौलाना मदनी यांनी पाच लाखांचे पारितोषिक जाहिर केले आहे. तर मुस्कान खान या तरुणीचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याचा प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर ताहेरा शेख यांनी मांडला आहे. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, या जिगरबाज तरुणीचे नाव उर्दू घराला देवून आम्ही तिचा सन्मान करणार आहोत. याबाबत आगामी महासभेत याबाबतचा प्रस्ताव सादर करुन त्याला एकमताने मंजुरी मिळवून देण्याचे आवाहन देखील महापौर शेख यांनी केले आहे. (Hijab Day organized at Malegaon in Nashik in support of Hijab)
इतर बातम्या
धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड, नागरिकांना दमबाजी, नाशकातले पाच गुंड पोलिसांच्या ताब्यात