इगतपुरी/ नाशिक : नाशिक जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मागील महिन्यातही झालेल्या गारपीटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होतात न होतात तेच आता पुन्हा एकदा गारपीट झाल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा व वीटभट्टींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जगायये कसे असा सवाल आता उपस्थित केला आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेळगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर, टाकेद परिसरात अवकाळी पावसाबरोबरच जोरदार गारपीट झाली आहे.
त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही झाला आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे.
भाजीपाला, गहू, मका, कांदा, आंबा आणि वीटभट्टी, जणांवराचा चारा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हवलदिल झाला आहे. त्यामुळे आता शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केली आहे.
अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्या शेतात भाजीपाला, गहू, मका, कांदा आणि आंबा पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंब्याच्या ऐन हंगामामध्ये गारांच पाऊस झाल्याने त्याचा फटका आंबा उत्पादनावर होणार आहे.
यावेळी शेतीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.