नाशिक | 23 January 2024 : रावणाचा आत्मविश्वास खचवा, राज्यातील आणि दिल्लीतील रावण पराभूत होऊ शकतो, हे लक्षात ठेवा, असा हुंकार खासदार संजय राऊत यांनी भरला. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या शाब्दिक टोल्यांनी अधिवेशनस्थळी खसखस पिकली तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. रामायणातील दाखले देत त्यांनी दिल्ली आणि राज्यातील रावणाला पराभूत करणे अवघड नसल्याचा दमदार दावा केला. त्यांच्या दमदार भाषणाने सर्वांचेच चेहरे प्रफुल्लित झाल्याचे दिसले. काय हल्लाबोल केला खासदार संजय राऊत यांनी?
तुम्ही तर संयमी योद्धा
प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातील वनवासाचा दाखला खासदार राऊत यांनी दिला. राज्याभिषेक झालेला असताना, सर्व व्यवस्थित असताना रामाला वनवास पत्कारावा लागला. प्रभू श्रीराम युवराज होते प्रभू श्रीराम राजा होता. त्याला या अन्यायाविरोधात भडकविण्यात आले. पण राजा राम हा शांत राहिला आणि संधीची वाट पाहत राहिला. पुढील 14 वर्षे आपल्याला या प्रकारचे जीवन जगायचं आहे की हातातलं राज्य जात आहे राजपुत्र आपण राजपुत्र आहोत हे सुद्धा जातंय आणि आपल्याला वनवासात जावं लागत आहे पण रामाचा संयम बघा आपल्या पाहतो रामाचा संयम पहा राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय अयोध्येचा स्वामी होतोय यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं लागतंय म्हणून तो निराश आणि दुःखी सुद्धा नाही. तो संयमी आहे, असे सांगत अधिवेशनाबाहेरली पोस्टरवरच्या ओळीचा उल्लेख त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे संयमी योद्धा असल्याची ती ओळ त्यांनी अधोरेखित केली.
रावण सुद्धा अजिंक्य नाही
यावेळी त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. रामायणातील अनेक दाखल्यांचा त्यांनी आधार घेतला. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला वाटतं रावण अजिंक्य नाही. पण तो अजिंक्य नव्हता. आजचा रावण अजिंक्य नाही तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता त्या रावणाला बालीन सुद्धा हरवलं होतं. त्या वानराने रावणाला पराभूत केले होते. त्याला बगलेत पकडून किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता हे डोक्यातून काढा, आजचा रावण सुद्धा अजिंक्य नाही, असा टोला त्यांनी लगावला. दिल्लीच्या रावणासमोर झुकणार नाही असा इशारा त्यांनी या अधिवेशनात दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आता लोकसभेत जोमाने कामाला लागणार असल्याचे सूचक वक्तव्यचं जणू त्यांनी केले आहे.