नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात गेल्या काही तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालयं. सुरगाणा येथील अनेक शेतकऱ्यांचे पिकांसह शेतही वाहून केले आहेत. इतकेच नाही तर पुराच्या पाण्यात दोन तरूणही (Young) वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. सुरगाण्याच्या गुलाबीगाव अर्थात भिंतघर येथील दोन युवक पुरात वाहून गेल्याची घटना समोर आलीय. पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान (Damage) झाले आहे. शिवाय शेतामध्ये जनावरेही अडकून पडली आहेत.
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरूणांची नावे सुरेश कडाळी आणि प्रभाकर पवार अशी आहेत. हे तिघेही सोमवारी कामानिमित्त बुबळी येथे गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वापस येत असताना जामनेमाळच्या फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटार सायकलने जाताना तिघेही पडले. यात सुरेश कडाळी व विजय वाघमारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर मागे बसलेला प्रभाकर पवार सुदैवाने बचावला आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागलीयं. भिंतघर येथील वाहून गेलेल्या तरूणांचा शोध घेतला जात असून पुलापासून काही अंतरावर मोटरसायकल व छत्र्या आढळल्या आहेत. मात्र दोघे अद्यापही सापडले नाहीयंत. नातेवाईक चिंतेत असून दोघांचा शोध सुरू आहे. नातेवाईकांसह ग्रामस्थ देखील पुरात वाहून गेलेल्या या तरूणाचा शोध घेत आहेत.