नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी पुढे येते आहे. बंदी वादी कैद्यांनी मोठा हल्ला करत पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले. पोलीस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा कैद्यांनी मिळून जीव घेणा हल्ला केलायं. या घटनेनंतर आता पोलिस (Police) दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कैद्यांना पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये आणण्यात आले होते. आज सकाळी हा हल्ला (Attack) झाल्याची माहिती मिळते आहे. या हल्ल्यानंतर पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये बंदी वादी कैदी एक महिन्यांपूर्वीच आणण्यात आले होते. ज्या कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केलायं हे सर्व कैदी बंदी वादी असल्याची देखील माहिती मिळते आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रभूचरण पाटील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
आर्श्चयकारक बाब म्हणजे या एका पोलिस कर्मचाऱ्यावर तब्बल दहा ते बारा कैद्यांनी मिळून हल्ला केलायं. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारनंतर भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. कारागृहात आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बंदी वादी कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर नेमका कोणत्या कारणावरून हल्ला केलायं, हे अध्याप कळू शकले नाहीयं.