नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस होताच गिरणा ( Girna ) धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक ( nashik ) विभागात मुसळधार पाऊस सुरू होताच पाण्याचा प्रवाह हा खान्देशच्या दिशेने मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे सावधगिरी म्हणून प्रशासन धरणातून विसर्ग करण्याचा निर्णय घेत असते. गिरणा धरणातून गिरणा नदी पात्रात 14 हजार 256 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. गिरणा धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी दोन फुटाणे उघडले आहे. त्यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ( order ) देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये होत असलेल्या पावसामुळे खान्देशची भागीरथी म्हणून ओळखला असलेल्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
गिरणा धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी दोन फुटाणे उघडण्यात आले आहे. सध्या 14,256 क्युसेसने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जळगाव गिरणा पाटबंधारे यांच्या वतीने गिरणा नदीकाठच्या गावांना पत्र देऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक शहरात अतिवृष्टिची नोंद झाली असून सायंकाळी तीन तासातच 76.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
एकूणच नाशिक शहरात झालेल्या या धुव्वाधार पावसाने झोडपून काढल्याने प्रशासनाने तातडीने गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असला तरी नदी काठच्या गावांनी काळजी घेण्याची गरज आहे.
नाशिकच्या सराफ बाजारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने व्यवसायिकांची मोठी तारांबळ उडाली होती. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला असला तरी धुळे, जळगाव, चाळीसगाव, भुसावळ या भागात प्रशासन सतर्क झालेले असते.
आताही अतिवृष्टिची नोंद झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच स्थलांतरित व्हावे अशाही सूचना देण्यात आल्या आहे.