Photo Gallery | माझ्या ओठी नाव भीम, गौतमाचं येई; नाशिकमध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहात!

| Updated on: Apr 14, 2022 | 4:10 PM

नाशिकमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंचा जनसागर रस्त्यावर उतरला होता.

1 / 4
नाशिकमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शालिमार व नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रात्री बारा वाजता पुष्पहार अर्पण करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

2 / 4
नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते युगपुरुष या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

3 / 4
नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तरुणांनी विविध कार्यक्रम घेतले. ठिकठिकाणच्या मंडळांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जय भीम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, या जयघोषाने परिसर निनादून गेला.

4 / 4
नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जंयतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हजारोंचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. रात्रीपासून तरुणांनी गर्दी केली होती. दिवसभरही शहरात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लागल्या. शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.