मालेगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन पातळी घटल्याने गतप्राण झालेल्या मनमाडच्या (Manmad) दत्ताचे शिंगवे येथील सावित्रीबाई थोरात यांना प्राण गमवावे लागले. ही वेळ कोणावर येऊ नये यासाठी त्यांचे पती छगन थोरात , मुले काशिनाथ थोरात व प्रा.शशिकांत थोरात यांनी त्यांच्या वर्षाश्रद्धाला अवांतर खर्चाला फाटा देत आलेल्या पाहणे मंडळी व ग्रामस्थांना नैसर्गिक ऑक्सिजन (Natural oxygen) झाडांचे वाटप करून पर्यारणाबाबत जनजागृती केली. विशेष म्हणजे त्यांनी वर्षाश्रद्धाच्या पूजेलाही त्यांनी झाडांची आरास केली होती. त्यांच्या उपक्रमांमुळे झाडे लावण्याला प्रेरणा मिळेल व 25 टक्के जरी झाडे जगली तरी त्यातून आई सदैव जिवंत राहील अशी थोरात परिवाराची भावना आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांनी जीव गमावला आहे. आत्तापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. त्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाने अवघं जग थांबवलं होतं. अनेक बाजारपेठा बंद केल्या होत्या. संपुर्ण जग थांबवलेल्या कोरोनाने अद्याप पुर्णपणे गेलेला नाही. आता अजूनही काही राज्यात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत.
एका दिवसात 2,593 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाल्यामुळे, भारतातील कोविड-19 प्रकरणांची एकूण संख्या 4,30,57,545 वर पोहोचली आहे. तर सक्रिय प्रकरणे 15,873 वर पोहोचली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी अद्यतनित केलेल्या आकडेवारीनुसार, 44 ताज्या मृत्यूंसह मृतांची संख्या 5,22,193 वर पोहोचली आहे, सकाळी 8 वाजता एकूण संक्रमणांपैकी 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. तर राष्ट्रीय कोविड-१९ बरे होण्याचा दर 98.75 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 794 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे.