कोरोनाचा प्रादुर्भाव कमी, नाशिककरांना आता चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीचा ‘ताप’!

| Updated on: Aug 23, 2021 | 9:36 AM

नाशिक शहरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी आता चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीने नाशिककर हैराण झाले आहेत. नाशिक मनपाच्या वतीने शहरात फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी सर्वसामान्य नाशिककर करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी, नाशिककरांना आता चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीचा ताप!
नाशिककरांना चिकनगुनिया आणि डेंग्यूचा 'ताप'
Follow us on

नाशिक :  नाशिक शहरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी आता चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीने नाशिककर हैराण झाले आहेत. नाशिक मनपाच्या वतीने शहरात फवारणी व आरोग्य सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी सर्वसामान्य नाशिककर करत आहेत.

या साथीच्या रोगांमुळे नाशकातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले असून मनपाने याकडे गांभीर्याने लक्ष देत आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी आता नाशिककरांकडून होत आहे.

नाशिककर चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीने हैराण!

सध्या नाशिकमध्ये व्हायरल फिव्हर, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. व्हायरल फिव्हरमध्ये अनेक रुग्णांना औषध-गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचं दिसतंय. इन्फ्लूएन्झामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसत आहेत. अनेकांचा ताप आठवडाभर जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे.

कोरोनामुळे भीतीचं वातावरण

वातावरणातल्या बदलांमुळे नाशिकमध्ये आजारांचं प्रमाण वाढलं आहे. पण नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणं सारखीच असल्याने नागरिक आणि लहान मुलांचे पालक घाबरून जात आहेत. रुग्णांचा ताप जात नसल्याने कोरोना आणि इतर काही लक्षण दिसतात का यांच्या चाचणी आणि तपासण्या करण्यात वाढ झाली आहे.

डॉक्टरांकडून वेगवेगळ्या तपासण्यांची सूचना

डॉक्टरांकडे गेल्यानंतर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगितलं जात आहे. यात रक्त, लघवी, कोरोनासह इतर चाचण्यांचा समावेश आहे. ज्यांना किरकोळ लक्षणं आहेत त्यांना गोळ्या-औषधांसोबत गरज वाटल्यास इंजेक्शनही दिलं जात आहे. व्हायरल फिव्हर, फ्लू, डायरिया, न्यूमोनिया ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

(large number of patient suffering from Chikungunya and Dengue in maharashtra nashik)

हे ही वाचा :

Rakshabandhan | हेल्मेटधारक बाईकस्वारांना राखी, नाशकात पेट्रोल पंपावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं अनोखं रक्षाबंधन

विकास ही न थांबणारी प्रक्रिया, आपत्तीकाळातही विकासकामे सुरूच; भुजबळांच्या हस्ते नाशकातील विकासकामांचे भूमीपूज