नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Nifad) तालुक्यातील कसबे सुकेणे येथे मागच्या एक महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत होता. त्याचबरोबर अनेकांना दर्शन देत होता. बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास सावजच्या शोधात असताना अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद (Caught the leopard) केले. त्यानंतर त्या परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कारण मागच्या एक महिन्यांपासून शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत होते.
रात्रीच्यावेळेस निफाड वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी बिबट्याचा शोध घेत होते. त्याचवेळेस योग्य ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरातील लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. निफाड वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबट्याला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.