मालेगावः मालेगावमध्ये 599 धार्मिक स्थळांवरील भोंगे (Loudspeaker) विनापरवानगी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नियमांचे पालन केले नाही केल्यास कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तर राज्य सरकारची नियमावली, सर्वोच्च न्यायालयाच्या (Court) आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन कूल जमातच्या सदस्यांनी तसेच आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थवर झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंगे हटाव नाऱ्याने राजकीय क्षेत्रातही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावरून राजकारण तापले जात आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्याची नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी 3 मे पर्यंत परवानगी नाही घेतल्यास कारवाईचा इशारा दिला. मात्र, आता पांडेय यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी येणारे नवे पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी म्हणाले की, धार्मिक स्थळांच्या भोंग्याची डेसिबल मर्यादा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान ध्वनिक्षेपक बंद राहतील. न्यायालयाचा आदेश व नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, भोंग्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी खांडवी यांनी कूल जमाती तंजिमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
बैठकीत खांडवी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांची मर्यादा निश्चित केल्याचे स्पष्ट केले. मर्यादेचे पालन करणे जनतेची, तर अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगितले. दिवसा 55, रात्री 40 डेसिबलच्या आत ध्वनिमर्यादा निश्चित केली आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेदरम्यान भोंगे बंद राहतील. भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, शहरातील सर्वच धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे बसविण्यात आले आहेत.
खांडवी म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून डेसिबल मर्यादा तपासली जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यास डेसिबल मीटर उपलब्ध करून दिले आहे. डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. सर्वधर्मीयांनी रितसर परवानगी घेऊन ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मर्यादेचे भान राखण्याचा सल्लाही खांडवी यांनी दिला.
मशीद – 285
मंदिर – 265
दर्गा – 38
बुद्धविहार – 8
गुरुद्वारा – 2
चर्च – 1
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!