नाशिक : सध्या राज्यभर पावसानं थैमान घातलंय. नाशिकमध्येही (Nashik Rain) जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अश्यातच आता नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सुरगाणा तालुक्यातील अलंगून बंधारा (Alangun Dam Burst) फुटला. त्यामुळे अलंगून गावातील शेकडो घरं पाण्याखाली गेली आहेत. सुरगाणा भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सध्या या भागात लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची उंची वाढवल्याने दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. नागरिकांनी वेळीच तिथून सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर केलं. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र संपूर्ण गावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं काही घरं वाहून गेली आहेत. काही जनावरं या पाण्यात वाहून गेली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सुरगाणा तालुक्यातील अलंगून बंधारा फुटला. त्यामुळे अलंगून गावातील शेकडो घरं पाण्याखाली गेली आहेत. सुरगाणा भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सध्या या भागात लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची उंची वाढवल्याने दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. नागरिकांनी वेळीच तिथून सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर केलं. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र संपूर्ण गावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं काही घरं वाहून गेली आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सप्तशृंगी गडावर गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सप्तशृंगी मंदिरातील परतीच्या मार्गावरील संरक्षक भिंतीवरील दगड, माती वाहून आल्याने 4 भाविक आणि 2 लहान मुले खाली कोसळून गंभीर जखमी झाले आहेत. सप्तश्रृंगी देवस्थान संस्थानच्या दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये दोन महिला, दोन पुरूष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. परतीच्या मार्गावरील डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने या पाण्याचा जोर वाढला. हे पाणी संरक्षण भितीवरून मोठ्या प्रमाणात वाहू लागले आणि ही भिंत कोसळून पायरीवर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले. यावेळी भाविक हे पायरी उतरत असतांना पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पायरीवरुन वाहत गेले.