“मी इथे निवडणूक लढायला नाही तर निवडणूक जिंकायला आलो”; पदवीधर निवडणुकीत मविआने सत्ताधाऱ्यांबरोबर शड्डू ठोकला…

| Updated on: Jan 19, 2023 | 6:23 PM

शुभांगी पाटील यांना आपण निवडून आणायचे आहे आणि त्यांना आपण विधान परिषदेवर सभापती निवडून आणायचे आहे. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मी इथे निवडणूक लढायला नाही तर निवडणूक जिंकायला आलो; पदवीधर निवडणुकीत मविआने सत्ताधाऱ्यांबरोबर शड्डू ठोकला...
Follow us on

नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप, शिंदे गट असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबत आता जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे आज खासदार विनायक राऊत आणि सुभाष देसाई यांनी जोरदार निशाणा साधला.

यावेळी सुभाष देसाई यांनी बोलताना शुभांगी पाटील यांच्या जागेविषयी विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, मी इथे निवडणूक लढायला नाही तर निवडणूक जिंकायला आलो आहे असा विश्वास नाशिकमध्ये व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पदवीधर मतदारस संघाच्या निवडणुकीवरून जोरदार हल्लाबोल करण्यात येऊ लागला आहे.\

काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले. तांबे पितापुत्रावर कारवाई करण्यात आल्याने आता काँग्रेसनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील याच विजयी होणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे सुभाष देसाई यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवतच सत्याजित तांबे यांच्यावर टीका करताना त्यांना ज्याने आपल्या पक्षाशी गद्दारी केली आहे त्यांना जनता माफ करत नाही असा खोचक टोलाही त्यांना लगावला आहे.

आमदार ऋतुजा लटके यांनी बाजी मारलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण सांगत सुभाष देसाई यांनी भाजपने कसा त्रास दिला त्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी बोलताना ते म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत आपण बघितलं आहे की, किती त्रास झाला असे सांगत न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला,

आणि त्यानंतरच त्यांना निवडणूक लढवता आली असंही त्यांनी यावेळी सांगितले. ऋतुजा लटके यांची आठवण करुन देत भाजप आणि शिंदे गटाकडून आपल्याला कसा त्रास दिला जातो ती गोष्टही त्यांनी यावेळी सांगितली.

अंधेरी पोटनिवडणुकीची सुभाष देसाई यांनी आठवण सांगितल्यानंतर त्याचवेळी ते म्हणाले की, शुभांगी पाटील यांना निवडून येण्यासाठी आपण कुठलीही कसर ठेवायची नाही.

त्यातच शुभांगी पाटील यांना मातोश्रीचा पाठिंबा असल्यामुळेच त्यांना महाविकास आघाडीचादेखील पाठिंबा मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे ज्यावेळी ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना एकत्र येते, त्यावेळी समोरच्याचा पालापाचोळा होतो असा टोला त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे.

शुभांगी पाटील यांना आपण निवडून आणायचे आहे आणि त्यांना आपण विधान परिषदेवर सभापती निवडून आणायचे आहे. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.