Malegaon | इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोठा वाटा, राष्ट्रवादीच्या आसिफ शेख यांचा आरोप

| Updated on: Aug 01, 2022 | 9:51 AM

राष्ट्रवादी भवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकाच्या घडामोडींपासूनच एमआयएम आमदारांचे भाजप व शिंदे गटाशी छुपी युती झाल्याचा गंभीर आरोप यावेळी केला.

Malegaon | इम्तियाज जलील यांचा महाविकास आघाडी सरकार पाडण्यात मोठा वाटा, राष्ट्रवादीच्या आसिफ शेख यांचा आरोप
Follow us on

मालेगाव : मालेगावमध्ये (Malegaon) आमदार मौलाना मुफ्ती आणि त्यांचा पक्ष एमआयएम यांची भाजप आणि शिंदे गटाशी छुपी युती असून महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आमदार मुफ्ती व खासदार इम्तियाज जलील यांचा वाटा आहे, असा मोठा आरोप राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आसिफ शेख यांनी केला आहे. आसिफ शेख पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मालेगाव दौ-यात शिंदे यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर मौलाना मुफ्ती यांनी उपस्थितीत असणे हे यातून स्पष्ट झाले आहे. एकीकडे मुस्लिमांच्या नावाने मते मागायची अन दुसरीकडे हिंदुत्ववादी सरकारसोबत सौदेबाजी करायची ही मुस्लीम मतदारांची फसवणूक असून याचे उत्तर असद्दिन ओवैसी, खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आणि मुफ्ती यांनी द्यावेत असे आसिफ शेख यांनी म्हटले आहे.

आसिफ शेख यांनी केला मोठा आरोप

राष्ट्रवादी भवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शेख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकाच्या घडामोडींपासूनच एमआयएम आमदारांचे भाजप व शिंदे गटाशी छुपी युती झाल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. शेख म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रतिनिधी या नात्याने भेट घेणे गैर नसले तरी मुफ्ती आणि इम्तियाज यांच्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकांपासूनच्या हालचाली व शिंदे गटाच्या खासदार आमदारांशी भेटीगाठी बघितल्यानंतर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारशी एमआयएमचे सुत जुळले आहे का? एमआयएमची भूमिका नक्की काय? याविषयी स्पष्टीकरण द्यावे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाशी आधीपासूनच त्यांचे मैत्रीपूर्ण सबंध

यावेळी पत्रकार परिषदेत शेख यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मालेगाव दौ-यातील जाहिरातीमध्ये एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांचे फोटो व काही ध्वनीचित्रफिती पुरावे म्हणून सादर करीत एमआयएमच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. महाराष्ट्राच्या मुस्लिमांचा विश्वासघात करण्याचे राजकारण एमआयएम करते आहे. भाजप व आता शिंदे गटाशी आधीपासूनच त्यांचे मैत्रीपूर्ण सबंध असून मुख्यमंत्री यांच्या सभेदरम्यान आमदार मुफ्ती यांनी व्यासपीठावर पूर्णवेळ उपस्थित राहणे त्याचाच मोठा पुरावा आहे. आता हे जनतेपासून लपून राहिले नाही. याची उत्तरे एमआयएमच्या नेत्यांना द्यावी लागतील.