मालेगाव : नऊवारी साडी महाराष्ट्राची शान आहे. आधी मोठ्या प्रमाणात महिला नऊवारी साड्या घालत होत्या. आता नऊवारी साड्या वापरण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे या साडीची मागणी घटली. या साडीला वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे साडी व्यापारी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बाजारात नऊवारी साडीचा स्टॉक शिल्लक आहे. त्यामुळे उत्पादन थांबवावे लागले. कागारिकांना आठवड्यातून तीनच दिवस काम मिळत आहे. याचा आर्थिक फटका कारागिरांच्या कुटुंबावर पडत आहे.
मालेगावच्या रंगीत साडीची देशात आगळी वेगळी ओळख आहे. अनेक व्यावसायिक आणि कारागीर मालेगावात रंगीत साडी तयार करतात. देशातील अनेक ठिकाणांहून मालेगावच्या साडीची मागणी असते. मार्केटमध्ये आलेल्या मंदी आणि महागाईचा फटका मालेगावच्या व्यावसायिकांवर बसला. लाखो रंगीत नऊवारी साड्या सध्या मालेगावात पडून आहेत. मागणी कमी झाल्याने व्यावसायिकांनी देखील उत्पादन कमी केलं. त्याचा थेट परिणाम कारागिरांच्या आयुष्यावर होत आहे.
वर्षानवर्षे साड्या बनवणाऱ्या कारागिरांना मंदीचा फटका बसला. त्यांचे कुटुंबदेखील अडचणीत सापडले आहे. साडीचा स्टॉक शिल्लक राहत आहे. कारखानदार यांनी उत्पादन कमी केले. आठवड्यात केवळ तीन दिवस या कामगारांना काम मिळत आहे.
मालेगावची रंगीत साडी म्हणजे मराठमोळ्या गृहिणींची आगळी-वेगळी ओळख आहे. मार्केटमध्ये आलेली मंदी आणि महागाई या कारणांमुळे महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी ही नऊवार साडी सद्या कालबाह्य ठरू पाहत आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारी रंगीत साडीची अलीकडच्या काळात मागणी कमी झाली.
लाखो रंगीत साड्या सध्या नाशिकच्या मालेगावात स्टॉकमध्ये पडून आहेत. बाहेरील राज्यातीलही मागणी घटल्याने त्याचा फटका व्यावसायिक व कारागिरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कारागिरांच्या कुटुंबीयांवर फार मोठं संकट कोसळलं आहे. साडीचे व्यापारीही नाराज आहेत. त्यांच्याकडे असलेला स्टॉक केव्हा संपणार? तेव्हाच ते नवीन साड्या तयार करू शकतील. तोपर्यंत व्यवसाय ठप्प पडला आहे.