नाशिक : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) निरर्माणाचे स्वप्न सत्त्यात उतरले आहे. येत्या 22 जानेवारीला श्री रामाचे बाल रूप रामललाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्या निमित्त ठिकठिकाणाहून मंगल अक्षता पाठवण्यात येणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात राम जन्मभूमीच्या मंगल अक्षदा कलशाच होणार पूजन होणार आहे. अभाविपच्या मागणीनुसार हे कलश पूजन होणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते कलश पूजनाची अभाविपने केली मागणी केली होती.
मंगल कलश पुजनाचा कार्यक्रम मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती आहे. कलश पूजनाच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे विद्यापीठाने परिपत्रक काढले आहे. मात्र या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतले आहे. विद्यापीठाच्या प्रांगणात एखाद्या धर्माचा कार्यक्रम घेण्यास संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे पुराणात दाखले आहे. त्यामुळे श्रीरामांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे. श्रीरामाची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे श्री काळाराम मंदिर प्रमुख मंदिर मानले जाते. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटीत आल्यानंतर जेथे त्यांनी वास केला होता. त्यामुळे या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळ्या आधी मोदींनी अतिप्राचीन काळारामचे दर्शन घेण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या आधी मोदी नाशिक दौऱ्यावर आलेत मात्र काळारामचे दर्शन घेण्याचा त्यांचा योग आला नाही. त्यामुळे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा नाशिकमधे येणार आहेत त्या दिवशी त्यांनी काळारामचे दर्शन घेण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.