नाशिक : नाशिक शहरात सीएनजी गॅस (CNG gas) पाईपलाईनच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्याचा मनस्ताप नाशिककरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला. मात्र, आता या ठेकेदारासोबत मनपाच्या बांधकाम विभागावर देखील कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी केली आहे. या ठेकेदाराने रोड डॅमेजबाबत किती पैसे भरले आहेत याचा देखील खुलासा बांधकाम विभागाने करावा, अशी मागणीच शेख यांनी केली (MNS and Shivsena demand action on Public Works Department PWD for road damage).
आता हे पाईपलाईनचे काम रस्त्याच्या कडेने केले असते, तर चालले नसते का? असा सवाल करत हे काम म्हणजे नाशिककरांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलाय. एकूणच काय तर आता येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहेच आणि शहरातील खड्डे निमित्त मात्र झाले आहेत हे तितकंच सत्य आहे.
मनसेचे गटनेते सलीम शेख म्हणाले, “शहरात खऱ्या अर्थाने नागरिकांना ऑक्सिजनची गरज होती. मात्र, बांधकाम विभागाने घाईघाईने स्वयंपाक गॅसच्या पाईपलाईनचं काम ठेकेदाराला दिलंय. याआधी देखील आयुक्तांना आणि बांधकाम विभागाला पत्र दिलेलं आहे. ठेकेदारांनी रस्त्यांची नासधूस केलीय. रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालीय. बांधकाम खातं संबंधित ठेकेदाराने खोदकामासाठी डॅमेजचे पैसे भरले आहेत. मग त्यांनी याबाबत किती मीटर रस्त्यासाठी किती पैसे भरले याची नेमकी माहिती बांधकाम खात्याने द्यावी.”
“ठेकेदारांनी खोदलेले खड्डे ज्या प्रकारे बुजवले त्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत. त्यात लोक जखमी होत आहेत. जेव्हा ठेकेदार काम करत होता तेव्हा महापालिकेचा एकही कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठिशी घातलंय. त्यामुळे पालिका अधिकारी देखील यात दोषी आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
MNS and Shivsena demand action on Public Works Department PWD for road damage