नाशिक : नाशिकच्या (Nashik) दोन वर्षांच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीयं. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात व्हीलावर संपूर्ण परिवार गेला होता. नाशिकच्या परिवारावर लोणावळ्यात (Lonavla) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा दोन वर्षांचा मुलगा स्विमिंग पुलजवळ एकटाच खेळत बसला होता. मात्र, यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो थेट स्विमिंग पुलमध्ये (Swimming pool) पडला. स्विमिंग पुलमध्ये पडल्यानंतर मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले.
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण फॅमिली नाशिकवरून लोणावळ्यातील व्हीलावर आली होती. मात्र, खेळत खेळत लेकरू स्विमिंग पुलजवळ गेले आणि त्याचा तोल गेल्याने ते स्विमिंग पुलमध्ये पडले. जवळ कोणीही नसल्याने त्याला स्विमिंग पुलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही. या दोन वर्षाच्या मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, शेवटी तो बुडाला.
बऱ्याच वेळापासून मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता आई- वडिलांना स्विमिंग पुलमध्ये मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. मुलाला तरंगताना पाहून आई वडिलांनी फोडला हंबरडा फोडला. ही संपूर्ण दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीयं. शिवबा पवार असे या मयत झालेल्या चिमुरड्याच नाव आहे. या घटनेनंतर नाशिक शहरात दुखाचे वातावरण बघायला मिळते आहे.