मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ यांचं नाशिककरांना महत्वाचं आवाहन; म्हणाले…

| Updated on: May 20, 2024 | 2:08 PM

Chhagan Bhujbal on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. छगन भुजबळ नाशिकमध्ये बोलताना ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मतदानाच्या दिवशी छगन भुजबळ यांचं नाशिककरांना महत्वाचं आवाहन; म्हणाले...
Nashik Chhagan Bhujbal on Loksabha Election 2024 Latest Marathi News
Follow us on

देशभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदान करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मतदान केलं. मतदानानंतर छगन भुजबळ यांनी देखील मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा वगैरे हा सगळा आता भूतकाळ झाला. आता आपण पुढे आलो आहोत. आज मतदान होत आहे. नागरिकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपला मतदानाचा हक्क बजवा, असं भुजबळांनी म्हटलं.

भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली. ही गोष्ट माझ्या कानावर आली. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की त्यांच्या छातीवर उमेदवाराच्या निशाणीचा बॅच होता. मी पोलीस आयुक्तांना सांगितलं की तो बॅच काढून घ्या आणि त्यांना मतदान करू द्या. त्याप्रमाणे सर्व सुरळीत सुरू आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

नागरिकांना काय आवाहन?

नाशिकमध्ये काही मतदान केंद्रावर टोमॅटो आणि कांद्याच्या माळा घालून मतदार आल्याचं पाहायला मिळालं. यावर भुजबळांनी भाष्य केलं आहे. मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेण्यात येत आहेत. मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळे मतदान करा. कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा. मतदान अधिकारी काय करणार? पण लोकांनी मतदान केलं पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.

राजकारणावर भुजबळ म्हणाले…

2014 आणि 2019 भुजबळ कुटुंब कुटुंबीयांपैकी एक उमेदवार होता. 2009 मध्ये समीर भुजबळ खासदार झाले होते. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेत आम्ही विरोधी पक्षात होतो त्यामुळे आम्हाला यश मिळू शकलं नाही. मात्र या तीन निवडणुकीनंतर आमचा उमेदवार उभा आहे त्याचं नाव आहे हेमंत गोडसे, असंही छगन भुजबळांनी यावेळी म्हटलं.