राष्ट्रवादीचे अजित पवार नेते छगन भुजबळ यांचं राजकीय कारकिर्दीवर भाष्य केलं आहे. भविष्यात मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, खासदारकी याची मला अजिबात अपेक्षा नाही. पक्ष देईल ती भूमिका मी मान्य करेल. ओबीसी आंदोलन वेळी मी मंत्रिपदाचा राजीनामा देवून सहभागी झालो. नाशिक खासदारकी उमेदवारी बाबत माझा विचार झाला.पण मी बघितलं काही अडचणी येतात. त्यामुळे मी त्या प्रक्रियेतून बाहेर पडलो. मी त्यासाठी काही उपोषण, आंदोलन करणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
छगन भुजबळ कांदा प्रश्नावर भाष्य केलं आहे. कांदा पिकविणारे शेतकरी हे गरीब आहेत. अचानक निर्यातबंदी होते तेव्हा कांदा फेकून द्यावा लागतो.त्याला काही भरपाई मिळत नाही. मागच्या काही वर्षात मी मागणी केली त्यावेळी कांदा अनुदान मिळाले होते. शेतकरी, व्यापारी व काही तज्ञ बसवा आणि निर्यातबंदी वर कायमस्वरूपी मार्ग काढा. कांदा निर्यातबंदी कायमची उठवा. साखर, द्राक्षे निर्यातबंदी आता हळूहळू उठवत आहे. या गोष्टी व्हायला नको, यावर मी पंतप्रधान मोदी यांना बोललो. अबकी बार मोदी सरकार, मुझे बिलकुल शक नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
उद्या ते 48 जागा जिंकू असे म्हणतील त्यावर विश्वास ठेवणार का? लोकांना ओढण्यासाठी या गोष्टी बोलायच्या असतात. ग्राउंड रियालिटी तशी नाही. महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मागच्या ईदच्या वेळी वाटणार होतो. पण आचारसंहिता सुरू झाली. त्यासाठी निधी मंजूर झाला. पण वाटता आला नाही. आनंदचा शिधा दलीत, मुस्लिम, हिंदू या सर्वांना मिळतो. आचारसंहिता उठली की मंत्री मंडळात निर्णय घेवून मार्गी लावतो. सण कुठलाही असो सर्वांनाच आनंदाचा शिधा दिला जातो. गणपतीच्या वेळी पण सर्वांना दिला जातो, असंही छगन भुजबळ म्हणालेत.