नाशिककरांचा शहर बससेवेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद, 27 बसेस 164 मार्गांवर धावल्या

| Updated on: Jul 09, 2021 | 11:30 AM

नाशिक शहर बससेवेला नाशिककरांना पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी शहरात 27 बस धावल्या आहेत.

नाशिककरांचा शहर बससेवेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद, 27 बसेस 164 मार्गांवर धावल्या
नाशिक शहर बससेवा
Follow us on

नाशिक: महानगरपालिकेने सुरु केलेल्या सिटीलिंक नाशिक शहर बससेवेचं उद्धाघटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काल करण्यात आलं. नाशिक शहर बससेवेला नाशिककरांना पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी शहरात 27 बस धावल्या आहेत. (Nashik citizens gave response to Nashik Citilink bus service on first day)

मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन पार पडल्यानंतर ही नाशिकची सिटीलिंक शहर बस सेवा सुरु कऱण्यात आली आहे. नाशिककरांनी या बससेवेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळालं. पहिल्याच दिवशी शहरात 27 बस धावल्या आणि 164 मार्गांवर या बसने मार्गक्रमण देखील केलं.एवढंच नाही तर एकाच दिवसात दीडशे ते दोनशेहून अधिक प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं.

सिटीलिंक शहर बससेवा यशस्वी होण्यासाठी नियोजन करा

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेने सुरु केलेली सिटीलिंक नाशिक शहर बससेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असल्याने नक्कीच नाशिककरांना प्रवास करताना त्याचा लाभ होणार आहे. परंतु सिटीलिंक बससेवा यशस्वी होण्यासाठी योग्य ते नियोजन महानगरपालिकेने करावे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिकेने एकूण 250 बस कार्यान्वित केल्या असून त्यामध्ये 200 बस सीएनजी असून 50 बसेस डिझेलवरील आहेत. परंतु येणाऱ्या काळात प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रीक बससेवा सुरु करण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक सिटीलिंक अडीच वर्षानंतर नाशिककरांच्यासेवेत

नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाची असलेल्या नाशिक महापालिकेच्या बहुचर्चित बससेवेची ट्रायल रन पूर्ण काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आली होती. अडीच वर्षांपासून रखडलेल्या बस सेवा अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रकल्प साकारण्यात आला आहे. सर्वपक्षीय विरोधानंतर देखील बससेवेला हिरवा कंदील देण्यात आला होता.

इतर बातम्या:

नाशिकच्या विकासासाठी ‘नियो मेट्रो’ प्रकल्प यशस्वी करणार; छगन भुजबळांची ग्वाही

नाशिकची बहुचर्चित बससेवा सुरु होणार, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटनाचा भाजपचा प्रयत्न

(Nashik citizens gave response to Nashik Citilink bus service on first day)