नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. नाशिक शहरात जुलै महिन्यात विक्रमी पाऊस (Rain) झालायं. 81 वर्षांचा विक्रम यंदा पावसाने मोडला आहे. 1941 साली जुलै अखेर 549.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. हा विक्रम मोडीत निघाला असून या वर्षी आतापर्यंत 550.6 मिमी पावसाची नव्याने नोंद झालीयं. 8 जुलै, 9 जुलै, 11 जुलै, 12 जुलै या दिवशी शहरात (City) दमदार पावसाची नोंद झाली असून तब्बल 1941 नंतर यंदा 549.5 मिमी झालायं.
नाशिक जिल्हात सुरू असलेल्या दमदार पावसाने जिल्हातील सर्वच नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. 25 दिवसांत शहरात दमदार पाऊस झाल्याने 81 वर्षांचा विक्रम मोडीस निघाला आहे. नाशिक जिल्हात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन पुराच्या पाण्यात न उतरण्याचे आवाहन देखील केले आहे.
जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाल्याने नद्यांना देखील पूर आलायं. गोदावरी दारणा संगमाचे दृश्य तर पाहण्यासारखेच आहे. यंदाच्या पावसामुळे नाशिककरांसोबतच मराठवाड्याचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. इकडे जायकवाडी धरणाचे पाणी पातळी 92 टक्कावर आले असून जायकवाडी धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाणे उचलणार आहेत. आणखी 9000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. जायकवाडी धरणातून एकूण 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. नाशिकमध्ये दमदार पाऊस झाल्याने यंदाचे पाण्याचे टेन्शन मिटणार हे नक्की आहे.