Corona निर्बंध हटवा; Nashik महापालिकेचे राज्य सरकारला साकडे, सोमवारपासून दिलासा मिळणार का?

| Updated on: Mar 17, 2022 | 2:17 PM

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 980 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 7 ने घट झाली आहे.

Corona निर्बंध हटवा; Nashik महापालिकेचे राज्य सरकारला साकडे, सोमवारपासून दिलासा मिळणार का?
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us on

नाशिकः राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील कोरोना (Corona) निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका (Municipal Corporation) हद्दीतील कोरोना निर्बंध हटवावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेत तर हजारो जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. आपल्या जीवलगांना वाचवण्यासाठी ऑक्सिजन हवा म्हणून कित्येक कुटुंब रस्त्यावर रांगेत उभे राहिले. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर गेली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे हे निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राज्य सरकार यावर सकारात्मक असल्याचे समजते. येत्या सोमवारपासून नाशिक महापालिका हद्दीत तरी निर्बंध उठू शकतात, अशी चर्चा आहे.

महापालिका हद्दीत लसीकरण योग्य

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, त्या जिल्ह्यांचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मात्र, नाशिकच्या ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात निर्बंध लागू आहेत. तर महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 92 टक्के नागरिकांनी घेतला आहे. दुसरा डोस 72.37 टक्के नागरिकांनी घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही शून्यावर गेली आहे. त्यामुळे शहराला कोरोना निर्बंधातून मुक्त करावे, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाला केली आहे.

सध्या किती आहेत रुग्ण?

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 980 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 7 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या कुठे आहेत रुग्ण?

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागात नाशिकमध्ये 2, बागलाण 1, चांदवड 0, देवळा 3, दिंडोरी 2, इगतपुरी 0, कळवण 2, मालेगाव 0, नांदगाव 2, निफाड 7, पेठ 4, सिन्नर 0, सुरगाणा 0, त्र्यंबकेश्वर 2, येवला 0 अशा एकूण 25 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 57, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 0 तर जिल्ह्याबाहेरील 0 रुग्ण असून असे एकूण 82 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 961 रुग्ण आढळून आले आहेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!