नाशिकः पालकांनो सजग रहा. आपली मुले शाळकरी असतील, तर विशेष लक्ष ठेवा. कारण बातमीच तशीच आहे. नाशिकमधून (Nashik) गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी ते 31 मार्चच्या दरम्यान तब्बल 81 अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण (Abduction) झाले आहे. त्यापैकी फक्त 40 जणांचा शोध लागला असून, अजूनही 41 जण बेपत्ता आहेत. पोलिसांकडून (Police) त्यांचा शोध सुरू आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 81 अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. मार्च महिन्यात अशीच एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. तिचा अधिक शोध घेतला. तेव्हा तिच्यावर घराजवळील युवकाने अत्याचार केल्याचे उघड झाले. या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्यामार्फत बेपत्ता पोलिसांचा शोध घेतला जात आहे. ते सापडले की त्यांचे समुपदेशन करून त्यांची पालकांशी भेट घडवली जात आहे.
अनेक अल्पवयीन मुले रागाच्या भरातही घर सोडतात. अगदी किरकोळ मागण्यांवरून घरातल्यांशी त्यांचे पटत नाही. काही तरी रागाचा भडका उडतो. अशावेळी मुले मागणी पूर्ण नाही झाली तर चक्क घर सोडून निघून जातात. त्यासाठी पालकांनी थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि या मुलांशी बोलण्याची, त्यांना समजवण्याची एक वेगळी पद्धत ठेवली की, हे प्रसंग टाळता येतात. विशेष म्हणजे मुलांशी असेलले बॉंडिंगही यातून अधिक घट्ट झालेले दिसते.
पालकांनी आपल्या मुलांचा मित्र झाला पाहिजे. तसे पाहिले, तर ही म्हटली तर अतिशय सोपी आणि म्हटली अतिशय अवघड गोष्ट आहे. आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे. मुले सांगतातही. फक्त त्यांचे आपण ऐकले पाहिजे. त्यांना सहज दिवसभर शाळेत काय केले, असा एक प्रश्न विचारून तर पाहा. मुले त्यांच्यासोबत घडलेले चांगले-वाईट सारेच सांगतील. मात्र, अनेक पालक मुलांनी सांगितलेले ऐकतच नाहीत. त्यांनी सांगणे सुरू केले की, त्यांना थांबवतात. त्यामुळे मुले हळूहळू आपल्यापासून गोष्टी लपवून ठेवतात ऐवजी सांगत नाहीत. आपण मुलांचे मित्र झालो की, यातले बहुतेक प्रॉब्लेम सुटतात.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!