नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नाशिककरांना लसीचा तुटवडा भासू लागल्याने नागरिकांची निराशा होऊ लागलीय. जिल्ह्यात जवळपास 12 लाखाहून अधिक नागरिकांच लसीकरण झालंय. त्यात काहींनी दोन्ही डोस घेतलेत तर काहींचा 1 डोस बाकी आहे. (Nashik district facing problems of lack of corona vaccine covishield vaccination stopped and covaxin available at only two center )
कोविशिल्ड चा साठा पूर्णपणे संपल्याने सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेत. सध्या फक्त दोन लसीकरण केंद्रांवर कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जातोय.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची गरज बघता नाशिक महापालिका 100 कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे.मात्र, लस केंद्र सरकार पुरवत असल्याने ती उपलब्ध होत नाहीये,मात्र जसा लस साठा उपलब्ध होईल तसं लसीकरण सुरू केलं जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने माहिती देण्यात आलीय.
कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सध्या सर्वत्र सुरु आहे. लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारकडून केला जात आहे. नाशिक शहारत लसीकरण केंद्रांवर नगरसेवकांनी लावलेले पोस्टर हटवण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नगरसेवकांना यानिमित्तानं चांगलाच दणका दिला आहे. लसीकरण केंद्रांवरील आणि शहरातील चौकाचौकात लावण्यात आलेले ‘मोफत लसीकरण’ चे फलक पालिकेकडून दोन दिवसांपूर्वी हटवण्यात आले आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसींच्या लसीकरणाचा खर्च शासनाकडून केला जात आहे. शासन पैसे भरत असल्याने नगरसेवकांकडून मोफत लसीकरणाचे पोस्टर लावल्यानं नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लसीकरणाच्या नावाखाली स्वतःचा प्रचार थांबवा, असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांना दिला होता. लसीकरणाच्या पोस्टरच्या निमित्तानं नाशिककरांना महापालिका आयुक्तांच्या आक्रमकतेचं दर्शन झालं आहे.
नाशिक शहरातील चौकाचौकात लावलेले मोफत लसीकरणानिमित्त नगरसेवकांच्यावतीनं लावण्यात आलेलं बॅनर आयुक्तांनी हटवले आहेत. लसीकरणाच्या जाहिरातींवरून नगरसेवक आयुक्त आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं पुढचं पाऊल, नाशिक सहकारी साखर कारखाना चालवण्याचा ठराव, महाराष्ट्रातील पहिला प्रयोगhttps://t.co/NwsRPXeAOm#Nashik | #NashikAPMC | #SugarMill | #BalasahebPatil | @Balasaheb_P_Ncp
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2021
संबंधित बातम्या:
नाशकात बिबट्यांची दहशत, वन विभागाचे अथक प्रयत्न, 2 दिवसांत 2 बिबटे जेरबंद
(Nashik district facing problems of lack of corona vaccine covishield vaccination stopped and covaxin available at only two center )