नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हात सर्वत्र संततधार पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून धरणामधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आलायं. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीयं. मात्र, या सततच्या पावसामुळे नाशिक जिल्हातील रस्त्यांचे तीन तेरा वाचल्याचे चित्र बघायला मिळते आहे. त्यामध्येच आता नाशिक तालुक्यातील गिरणारे, दुगाव येथील शिव रस्त्याला (Road) मोठे भगदाड पडल्याची घटना घडलीयं. गिरणारे, दुगाव, वाडगाव या तिन्ही गावांना जोडणारा हा उपरस्ता आहे. मात्र, पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे आता ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी अडचणींचा (Difficulties) सामना करावा लागतोयं.
नाशिक जिल्हात यंदाही जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न दूर झाला. जिल्हातील जवळपास सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलायं. कारण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस सुरूयं. मात्र, नाशिक जिल्हातील गिरणारे, दुगाव येथील शिव रस्त्याला चक्क मोठे भगदाड पडले आहे. रस्त्यावरील पुलाचा भराव गेला वाहून गेलायं.
गिरणारे, दुगाव येथे सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरील पुलाचा भराव पाण्यासोबत वाहून गेलायं. महिन्याभरापासून नागरिकांची ये जा करण्यासाठी मोठी गैरसोय होते आहे. मळ्यातील विद्यार्थांना गावात शाळेत येण्यासाठी दररोज तारेवरची कसरत करावी लागते आहे. ग्रामस्थांनी रस्ता परत एकदा तयार करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केलीयं. कारण दररोज ये जा करण्यासाठी नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो.