नाशिकः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ‘किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी’ ही मोहीम 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 24 एप्रिल 2022 रोजी ‘विशेष ग्रामसभे’चे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी (Farmer) सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी 24 एप्रिल 2022 रोजी विशेष ग्रामसभेत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
कधीपर्यंत भरावा अर्ज
विशेष ग्रामसभेत पात्र शेतकऱ्यांनी भरून दिलेले अर्ज घेऊन सर्व संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड 1 मे 2022 पर्यंत मंजूर होतील यादृष्टिने विहित पद्धतीनुसार कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी 1 मे 2022 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरून या योजनेचा लाभ घावा, असेही जिल्हाधिकारी श्री. गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी विशेष ग्रामसभेत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
– गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!