निवडणुकीचं चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता भाजपमध्ये, भाजप खासदाराच्या विधानाने भुवया उंचावल्या, राजकीय चर्चा काय?

| Updated on: Jan 27, 2023 | 12:30 PM

भाजपमधून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर सत्यजित तांबे कॉंग्रेसचे उमेदवार असण्याऐवजी ते अपक्ष उमेदवार आहे.

निवडणुकीचं चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता भाजपमध्ये, भाजप खासदाराच्या विधानाने भुवया उंचावल्या, राजकीय चर्चा काय?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकच्या पदवीधर शिक्षक मतदार संघांची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या केंद्रस्थानी राहिले आहे. त्यात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर दुसरीकडे भाजपनेही कोणत्याही उमेदवारला एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा आहे अशी चर्चा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे. त्यातच भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी नाशिकमध्ये एक भुवया उंचवणारे विधान केले आहे. त्यामध्ये सुजय विखे यांनी नाशिक मतदार संघाची निवडणूक बदलून टाकण्याची ताकद नगरच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असं सुजय विखे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी कोणता नवा डाव खेळणार याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

भाजपमधून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर सत्यजित तांबे कॉंग्रेसचे उमेदवार असण्याऐवजी ते अपक्ष उमेदवार आहे.

सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र भाजपने राजकीय खेळी करून सत्यजित तांबे यांनाच छुपा पाठिंबा दिला असून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

त्यातच निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील अर्ज माघारीच्या वेळी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे भाजपचा पाठिंबा सत्यजित तांबे यांनाच असल्याची चर्चा आहे.

त्यात सत्यजित तांबे यांनी पाठिंब्याबाबत मागणी केली नसून पाठिंब्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे ठरवतील असेही सुजय विखे म्हणाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.