मालेगाव : राज्यातील राजकारण आता वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. त्यातच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने महाविकास आघाडी आणि भाजप असा कलगीतुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे मालगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तंग झाले आहे. त्यावरूनच आता संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली होत. त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यता आला आहे.
ठाकरे गटीची सभा आणि ज्या बंडखोर आमदार यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे.
सभा होण्याआधीच शिवसेनेकडूनही ठाकरे गटाला सुनावण्यात आल्याने मालेगावमधील वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी ठाकरे गटावर टीका करताना आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांनी उद्धव ठाकर यांनी सभेतून आणि संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या सभेआधीच हे वातावरण अधिकच तापले आहे.
पालकमंत्री यांनी नाशिक जिल्हा आणि शहराच्या विकासाविषयी सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचा वेगवान पद्धतीने विकास केला जात आहे तसेच मालेगाव शहरात 100 कोटींची विकास कामं केली जात आहेत,
मात्र सोशल मीडियावरून विनाकारण शिवसेनेची बदनामी केली जात आहे. त्यासाठी खराब रस्त्यांच्या विषयी सोशल मीडियावरुन आम्हाला टार्गेट केले जात असल्याचेह त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने शिवसेनेवर टीका केली जात असते. तसेच गंभीर आरोपही केले जातात. त्यामुळे संजय राऊत यांनी आता बिनबुडाचे आरोप करू नयेत, जर त्यांच्याजवळ सबळ पुरावे असतील तर त्यांनी त्या संदर्भात न्यायालयात जावे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
तसेच उद्याच्या सभेतही उद्याच्या सभेतही ठाकरे गटाच्या नेत्यांनीसुद्धा खोटे आरोप करू नयेत, जी वस्तुस्थिती तिच मांडवी असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
पालकमंत्री दादा भूसे यांनी विधोनसभेतही सांगितले होते की, माझ्यावरील आरोप सिद्ध करा. त्यानंतर मी स्वतऋ राजकारणातून संन्यास घेईन मात्र आपल्यावर बिनबुडाचे आरोप करू नका अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
अद्वय हिरे यांनी किती पक्ष बदलले तसे आम्ही तसे पक्ष बदलू नाही असा टोला त्यांनी अद्वय हिरे यांना लगावला आहे. आम्ही ज्या पक्षात जातो त्याच पक्षात असतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
संजय राऊत माझ्यावर आरोप करतात कारण अद्वय हिरेंनी राऊतसाहेबांचे कान भरले असल्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करतात मात्रा त्याचा काय फायदा नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.