नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Heavy Rain) पुराच्या पाण्यात गुरुवारी रात्री एका बस (Private Bus) अडकली होती. व्होल्व्हो बस पुराच्या पाण्यात अडकली होती. अतिमुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात (Flood water) बस अडकली होती. ही बस काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी पुन्हा प्रयत्न सुरु करण्यात आले. पण रात्रभर पुराच्या पाण्यात अडकून पडल्यामुळे या बसला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जातेय. नाशिकमधील गाडगे महाराज पुलाखाली ही बस अडकली होती.
गंगापूर धरणातून गुरुवारी रात्री पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे गोदा घाट परिसरात पूर आला. अचानक पाणी वाढल्यानं ही खासगी बस पाण्यात अडकून पडली. सुदैवानं बस रिकामी होती. कुणी प्रवासही बसमध्य नसल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला होता. रात्री ही बस काढण्यासाठी बस काढण्याचे प्रयत्न सुरु होते. रात्री जेसीबीच्या साहाय्याने ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पण तरुणांनी केलेल्या या प्रयत्नांना यश मिळू शकलं नव्हतं.
आता नाशिकमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तसंच पुराचं पाणीही हळूहळू ओसरू लागलंय. पुराच्या पाण्याची पातळी आता कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात अडकण्यात आलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेत. दरम्यान, रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बसचा अर्ध्याहून अधिक भाग हा पाण्याखाली गेला होता. आता सकाळी पाणी ओसरल्यामुळे बसच्या आतील भागातलं पाणीही निघून गेलंय. मात्र यात बसचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यताय.
गुरुवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावत नाशिकमधील लोकांची एकच तारांबळ उडवली होती. धुव्वाधार पावसामुळे अखेर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. त्यामुळे पाण्याची पातळी वाढून गोदा घाट तुडंब भरला होता. रस्त्यावरही पुराचं पाणी आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. नाशिकमधील रस्तेही जलमय झाले होते.