नाशिक : सध्या राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढतोय. अश्यात नाशकातही (Nashik Rain) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. इगतपुरीतील दारणा धरणाच्या 52 दरवाजांमधून एकाचवेळी पाणी सोडण्यात आलं आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने 52 दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले आहेत. दारणा धरणातून (Darna Dam) 14 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणा धरणातील हे पाणी गोदावरी नदीत जातं. त्यामुळे सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गाड्यादेखील या पावसाच्या पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकला येणारे पर्यटक गोदाघाट परिसरात आपली वाहनं पार्क करत असतात. त्यामुळे ही वाहनं पाण्याखाली जातात. एक गाडी पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. तर काही झाडं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. काही झाडं अर्धी पाण्याखाली गेली आहेत.
इगतपुरीतील दारणा धरणाच्या 52 दरवाजांमधून एकाचवेळी पाणी सोडण्यात आलं आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने 52 दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले आहेत. दारणा धरणातून 14 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणा धरणातील हे पाणी गोदावरी नदीत जातं. त्यामुळे सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोदावरी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गाड्यादेखील या पावसाच्या पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकला येणारे पर्यटक गोदाघाट परिसरात आपली वाहनं पार्क करत असतात. त्यामुळे ही वाहनं पाण्याखाली जातात. सतर्कतेचा इशारा देऊनही अनेकजण गोदाघाट परिसरात आपल्या गाड्या पार्क करतात. त्यामुळे ही एक गाडी पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळतंय. तर काही झाडं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. काही झाडं अर्धी पाण्याखाली गेली आहेत.
आहेत.या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर धरण 65 टक्के भरलं आहे. काल धरणातून 10 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. परिणामी गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आलाय. या पूरामुळे रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे. तर दुतोंडया मारुती माने पर्यंत बुडाला आहे.