इगतपुरी, नाशिक : नाशिकच्या इगतपुरी जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग (Jindal Company fire) लागली आहे. इगतपुरीतील (Igatpuri) मुंढेगाव जवळची ही घटना आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. आगीवेळी मोठे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काहीजण या कंपनीमध्ये अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत आहेत आणि खरंतर जी पहिली कंपनीची इमारत जळाली होती त्या ठिकाणाहून दोन ते तीन कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न देखील प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र या दृश्यांमध्ये बघितलं तर या आज जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतेय.
जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावातील ही घटना आहे. जिंदाल कंपनीला लागलेल्या या आगीत काहीजण अडकल्याची माहिती आहे. 10 ते 20 जखमी झाल्याची माहिती आहे.
जिंदाल कंपनी या कंपनीमध्ये पाच ते सात हजार कर्मचारी काम करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या कंपनीच्या ज्या भागात हा स्फोट झाला त्या भागात 200 ते 250 कामगार काम करत होते.
आग लागल्याचं कळताच या कंपनीतील कर्मचारी तिथून पळून जाऊ लागले. पण आगीची दाहकता वाढत गेली. त्यामुळे काहींना तिथून बाहेर पडता आलं नाही. हे कर्मचारी तिथेच अडकले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.