मालेगाव : पहिल्याच पावसात मालेगाव (Malegaon) शहरातील रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. बेजबाबदार प्रशासन, लोकपतिनिधींमुळे जनता बेहाल झाल्याचे चित्र मालेगावमध्ये आहे. मालेगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून वाहनधारकांना रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागते आहे. कुठल्याही शहराचा विकास व्हायचा असेल तर तेथील प्रशासन (Administration) आणि लोकप्रतिनिधी यांची सकारात्मक मानसिकता गरजेची असते. मात्र मालेगाव शहरात उदासिन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमुळे रस्त्यांची (Road) चाळण झाली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचा दावा देखील केला होता. मात्र, पाहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
महानगरपालिकेत 84 नगरसेवक, 2 विधानसभा सदस्य, पुरेसे प्रशासकीय अधिकारी असून देखील शहराचा विकास मात्र हिरमुसला आहे. येथील बेजबाबदार प्रशासन, लोकप्रतिनिधीमुळे जनता बेहाल झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना झाल्याने स्त्याने पायी चालणे देखील मुश्कील झाले असून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मालेगाव शहरातील सर्वच रस्त्यांची दैना झाली असून अनेक रस्ते चिखलाचे आणि निसरडे झाले आहेत. इतकेच नाही तर रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सोयगाव कॅम्पसारख्या तर काही ठिकाणच्या रस्त्यांनी ये जा करणे देखील मुश्किल झाल्याने त्याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर झाला आहे. पहिल्याच पावसात मालेगावातील रस्त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे आता शहरातील रस्त्यांबाबत “काय ते रस्ते…. काय ते खड्डे….. सर्व काही नॉट ओके…! असे विनोद सुरू झाले आहेत.