नाशिक: देशात सातत्यानं वाढणाऱ्या इंधनतेलाच्या किमती लक्षात घेता नागरिकांनी इलेक्ट्रिक बाईक घ्याव्यात असं आवाहन करण्यात येत आहे. काही नागरिक इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक बाईक चार्जिक करताना काळजी घेतली नाही तर काय होतं याचा प्रत्यय आणून देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करताना स्फोट झाला. त्या स्फोटात बाईक पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्या रेसिडन्सीमध्ये काल एक व्यक्ती त्याची इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग करत होता. यावेळी काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं बाईकचा स्फोट झाला आणि जाग्यावर केवळ बाईकचा सांगाडा राहिला आहे. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या अपार्टमेंटमध्ये राहणारी 6 कुटुंब सुखरुप असल्याची माहिती आहे.
इंदिरानगर परिसरातील ऐश्वर्य रेसिडन्सीमध्ये इलेक्ट्रिक बाईख चार्जिग करताना स्फोट झाल्यानं विजेचे 6 मीटर जळाल्याचं समोर आलं आहे. ही घटना घडल्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात काही भागात पावसानं हजेरी लावली आहे तर काही भाग अद्यापही कोरडाच आहे. दिवसभरात सरासरी 13.69 टक्के एवढा पाऊस झाला आहे. पावसाची शक्यता बघता शेतकऱ्यांनी केली पेरण्यांना सुरुवात झाली आहे. तर पुढचे 5 दिवस धुवाधार पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
नाशिक शहरातील एकाच खाजगी रुग्णालयात स्पुतनिक लस दाखल झाली आहे. लसीबाबत नागरिकांकडून चौकशी करण्यात येत असून अनेकांनी आगाऊ मागणी नोंदवली आहे.. शहरात सध्या कोव्हीशिल्ड, कोवॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढल्यास स्पुतनिक देखील मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. स्पुतनिकच्या एका डोस साठी 1400 रुपये आकारले जाणार आहेत. तर 28 दिवसांनी दुसरा डोस मिळणार आहे. पुढच्या काही दिवसात आणखी दोन रुग्णालयांना स्पुतनिक लस मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या:
जनरेटरच्या धुराने कुटुंब संपवलं, झोपेतच 6 जणांचा मृत्यू, विदर्भ हादरला
Ashish Shelar LIVE | पंकजा मुंडे यांचं काही दबावतंत्र नाही – भाजप आमदार आशिष शेलार
Nashik Indiranagar Aishwarya Residency Electric bike blast during charging