लासलगाव : निफाड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात नुकताच यश मिळाले. निफाड तालुक्यात बिबट्याने इतका जास्त धुमाकूळ घातला होता की, लोकांना रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडण्यासही भीती वाटत होती. त्यानंतर वन विभागाने (Forest Department) तारेवरची कसरत करत अखेर बिबट्याला जेरबंद केले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, या घटनेला काहीच दिवस उलटून गेले असता येवला (Yeola) तालुक्यातील मुखेड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलायं.
निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणार बिबट्या जेरबंद करण्यास यश मिळाले. मात्र, आता येवला तालुक्यातील मुखेड परिसरात महालेखडा रोडवर रात्रीच्या सुमारास शेतात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने परत एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे महालेखडा रोडवर रात्रीच्या सुमारास शेतात बिबट्या असताना एक व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलायं.
शेतात बिबट्या मुक्त संचार करत असल्याचं येथील अमोल धुळसुंदर यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ स्पष्ट दिसते आहे की, एक बिबट्या शेतामध्ये फिरत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्या शेतात बसला आहे. आता या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.