मनोहर शेवाळे, मालेगाव : शहरात (nashik malegaon city) भटक्या कुत्र्यांचा (dog attack) उपद्रव वाढला असून मोठ्यांपासून लहानांपर्यंत अनेकजणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. सोयगाव, कॅम्प, संगमेश्वर, नवीन बसस्थानक, रमजान पुरासह परिसरात या भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. कचराकुंड्या, उकिरडा, कत्तल खाणे, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणांचा भटक्या कुत्र्यांनी ताबा घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे नागरिक आणि शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून पालिका प्रशासनाकडे (Nashik mahapalika news) वारंवार तक्रारी करूनही या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मालेगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हौदोस घातला आहे. रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा हे भटके कुत्रे पाठलाग करतात. यामुळे भीतीने शाळेत जाण्यास मुले टाळाटाळ करत असल्याची पालकांची तक्रार आहे. रात्री रस्त्याने ये-जा करणे कठीण झाले असून चालतच नव्हे, तर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा हे कुत्रे पाठलाग करतात. एखाद्या बाईकचा मोठा होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परंतु पालिका या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मागच्या 10 दिवसांत 200 हून अधिक जखमी झाले आहेत. त्या सगळ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात अनेकांनी डोस घेतले असून अनेकांचे डोस अजून बाकी आहेत. लोकांना घरातून बाहेर पडायला सुध्दा भीती वाटत आहे.