मनोहर शेवाळे, मालेगाव : ग्रामीण भागातल्या (Rural Area) विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी (for education) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजून ग्रामीण भागात एसटीची सुविधा (ST service) वेळेत मिळत नाही. त्यामुळे मुलं एसटीचा पास असताना सुध्दा भेटेल त्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळं एसटी असूनही नसल्यासारखीचं असल्याची स्थिती मालेगावात आहे.
एसटी आलीच तर ती थांबवत नाही, थांबलीचं तर ती अगोदरचं प्रवाशांनी फुल भरलेली असते. एसटीत जागा नसल्याचे सांगत वाहक विद्यार्थ्यांना एसटीत चढू देत नाहीत, अशा एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. मनमाड-नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची समस्या एसटी महामंडळ किंवा राज्य सरकार समजून घेईला का ?
मासिक पास असताना देखील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मिळेल त्या खाजगी शाळेत वाहनाने जावे लागतं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे. शिक्षणासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शाळेत वेळेवर जाण्यासाठी खाजगी वाहनांना हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चिमुकल्या मुली सुद्धा आहेत.
टँकर मध्ये बसण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी हे विदारक चित्र नांदगाव,मनमाडच्या ग्रामीण भागातील आहे. वाड्या,वस्त्या आणि छोट्या गावांमध्ये 5 वी पर्यंत शाळा असल्यामुळे त्यानंतरच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील गोर गरीब आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शहरात जावे लागते.