नाशिक : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका (Election) कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निवडणूका साधारणपणे आॅक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात होणार आहेत. आता नाशिक महापालिकेचे महापौर आणि स्थायी समिती सभापती यांचे अधिकार प्रशासकाकडे आहेत. 2017 ला महापालिकेच्या (Municipality) निवडणूका पार पडल्या होत्या. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आता महापालिकेतील सर्व अधिकार प्रशासनाकडे आले असून सध्या नाशिक महापालिकेमध्ये प्रशासन (Administration) राज बघायला मिळतंय. आता स्थायी समिती सभापती आणि महापाैर पदही प्रशासानाकडे आले असून यादरम्यान शहराच्या विकासासाठी नेमके कुठले महत्वाचे निर्णय प्रशासनाकडून घेतले जाणार हे बघण्यासारखेच ठरणार आहे.
नाशिक महापालिकेत आता पुर्णपणे प्रशासन राज आले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज एक मोठा निर्णय घेत स्थायी समिती सभापती आणि महापाैर हे पद प्रशासानाकडे घेतले असून त्यासंदर्भात सर्व अधिकार आता प्रशासनाकडेच असणार आहेत. ज्यावेळी नाशिक महापालिकेची निवडणूक होईल, त्यावेळी परत हे पद लोकप्रतिनिधींकडे जाईल. मात्र, तोपर्यंत हे दोन्ही पद प्रशासनाकडे असतील.
विशेष म्हणजे आयुक्तांच्या या निर्णयानंतर महापालिकेत आता अधिकाऱ्यांची महासभा होईल. गेल्या साडेपाच महिन्यांपासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता महासभेमध्ये आयुक्त नेमके काय काय निर्णय घेतात यावर माजी नगरसेवकांचे लक्ष आहे. आयुक्तांनी शहरातील खराब रस्त्यांवरून तीन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांची एक बैठक घेत ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. इतकेच नाही तर शहरातील खराब रस्त्यांची आयुक्त स्वत: पाहणी देखील करणार आहेत.