नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत 150 कोटींचा फटका, विकास निधीला कात्री लागणार? नगरसेवकांची कोंडी होणार?

| Updated on: Jul 07, 2021 | 11:51 AM

नाशिक महापालिका प्रशासन कमी उत्पन्न होईल या भीतीमुळं खडबडून जागे झालं आहे. महापालिकेकडून नगरसेवक निधी आणि विकास कामांच्या निधीला 25 टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत 150 कोटींचा फटका, विकास निधीला कात्री लागणार? नगरसेवकांची कोंडी होणार?
Nashik Municipal corporation
Follow us on

नाशिक: कोरोना संकटाचा मोठा फटका नाशिक महापालिकेला बसल्याचं दिसून आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट थांबवण्यासाठी करण्यात ब्रेक द चैनचे निर्बंध लागू करण्यात आले होते. नाशिक महापालिकेला नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठा फटका बसला आहे. पहिल्या तिमाहीत महापालिकेच्या उत्पन्नात 150 कोटींची घट आलेली आहे. (Nashik Municipal Corporation first three moth income low by 150 crore due to corona)

उत्पन्नात तीनशे कोटींची घट येण्याची शक्यता

नाशिक महापालिकेला कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्षाअखेर तीनशे कोटींची घट होण्याची भीती आहे. नाशिक महापालिका प्रशासन या भीतीमुळं खडबडून जागे झालं आहे. महापालिकेकडून नगरसेवक निधी आणि विकास कामांच्या निधीला 25 टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांची कोंडी होण्याची शक्यता

नाशिक महापालिकेकडून आर्थिक उत्पन्नात येणाऱ्या घटीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचा निधी आणि विकास कामांच्या निधीला 25 टक्के निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्यानं निधीला कात्री लागल्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांची मोठी कोंडी प्रशासनानं अत्यावश्यक कामांनाचं प्राधान्य देण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

नाशिकवर पाणीबाणीचं संकट

नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं तर शहरावर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळी खालावली आहे. गंगापूर धरण समूहात सरासरी 36 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरण समूहातील काही बंधारे कोरडेठाक पडलेले आहेत. पुढच्या 15 दिवसात पाऊस न झाल्यास शहरावर पाणी कपातीचं संकट ओढावण्याती शक्यता आहे. वरुणराजा प्रसन्न न झाल्यास नाशिककरांवर पाणीबाणी ओढावण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

नाशकात बिबट्याचा धुमाकूळ, 13 बकऱ्यांचा फडशा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

(Nashik Municipal Corporation first three moth income low by 150 crore due to corona)