नाशिक: नाशिक महापालिकेचं आज 2021/22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी 2759 कोटींचे अंदाजपत्रक महासभेवर सादर केले. नाशिक महापालिकेने उत्पन्न वाढीवर जोर आणि विकासकामांवर भर दिला आहे. उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना आणण्यावर भर तर आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचा विकास कामांवर जोर असल्याचं बोललं जात आहे. (Nashik Municipal Corporation Standing Committee approve budget for 2021-22 )
नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुचवलेल्या 2400 कोटींच्या तरतुदींमध्ये स्थायी समितीने वाढ केली. स्थायी समितीनं अंदाजपत्रक 2759 कोटींवर नेले आहे. त्यात मूलभूत सुविधांना वाव देण्यात आला आहे, असं बोललं जात आहे.
स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी नाशिककरांच्या विकासाससाठी चांगलं बजेट मांडल्याचं सांगितलं. मात्र, आता पुढील काळात खरच विकास होतो का ? हे पाहणं ही महत्वाचं आहे.
नाशिक महापालिकेचे 2759 कोटींचे अंदाजपत्रक महासभेत मंजूर केलं आहे. स्थायी समितीं अंदाजपत्रकात यंदा 300 कोटींची वाढ केल्याचं पाहायला मिळाले. पंचवटी,सिडको,सातपूर भागात 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती आहे. ऑक्सिजन निर्मिती प्लांट साठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचं उत्पन्न वाढीसाठी विशेष योजना आणण्यावर भर देण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानं सत्ताधारी भाजपनं विकास कामांवर भर देणारं बजेट मांडलंय का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये सध्या भाजपची सत्ता असून विरोधात शिवसेना आहे.
‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार https://t.co/u2N6DRgO1K @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @INCMaharashtra @BJP4Maharashtra @ChDadaPatil @bb_thorat #OBCReservation #mahavikasaghadi #nanapatole #Devendrafadnavis #BJPvsCongress
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
संभाजीराजे छत्रपती मला त्यांच्या पक्षात घेणार, याबाबत मलातरी काहीही माहिती नाही : छगन भुजबळ
नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
खासगी रुग्णालयांविरोधात नाशिकचे महापौर आक्रमक, बिलांमध्ये तफावत आढळल्यास मान्यता रद्द करण्याचा इशारा
(Nashik Municipal Corporation Standing Committee approve budget for 2021-22 )