नाशिकमध्ये गुढीपाडव्याचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द; पोलिसी दंडेलशाहीच्या निषेधार्थ निर्णय, प्रकरण काय?

| Updated on: Mar 26, 2022 | 11:36 AM

नाशिकमध्ये कोरोना काळात निर्बंधाच्या पालनाकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र, आता रुग्ण कमी झाल्यानंतर पोलिसांनी नाहक कागदी घोडे नाचवणे सुरू केले आहे. त्यामुळे नववर्ष स्वागत समिती आक्रमक झालीय. त्यांनी शहरातील गुढीपाडव्याचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केलेत. आता यावर पोलीस काय भूमिका घेतात, याची उत्सुकताय.

नाशिकमध्ये गुढीपाडव्याचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द; पोलिसी दंडेलशाहीच्या निषेधार्थ निर्णय, प्रकरण काय?
gudhipadwa
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गुढीपाडव्याचे (Gudhipadwa) सर्व सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय नववर्ष स्वागत समितीने घेतलाय. पोलिसांच्या (Police) आठमुठ्या धोरणाचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीचे प्रफुल्ल संचेती आणि नितीन वारे यांनी दिली. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आडकाठी आणली जात आहे. त्याच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला शहरात होणारे महारांगोळी, महावादन आणि अंतर्नाद हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे या कार्यक्रमासाठी दिवसरात्र एक करून तयारी करणारे 3 हजार ढोलवादक, रांगोळी आणि सांगितीक कलाकारांचाही हिरमोड झाला आहे. नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण घट आहेत. शहराची निर्बंध मुक्तीकडे वाटचाल आहे. येथील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र, तरीही पोलिसांची दंडेलशाही सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

राज्यात कुठे उठले निर्बंध?

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, त्या जिल्ह्यांचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

नाशिकचे चित्र काय?

नाशिकच्या ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात निर्बंध लागू होते. महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 92 टक्के नागरिकांनी घेतला आहे. दुसरा डोस 72.37 टक्के नागरिकांनी घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे शहराला कोरोना निर्बंधातून मुक्त करावे, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाला केली. त्यानंतर स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्देश देऊन येथील निर्बंठ उठवले. मात्र, त्यानंतरही पोलिसांची आडकाठी सुरू असल्याचा आरोप होतोय.

पोलिसांचे कागदी घोडे

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय कागदी घोडे नाचवण्यात माहीर आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीची घोषणा केली. त्यावरून हेल्मेट नसलेल्यांना थेट पेट्रोलबंदीपासून ते कार्यालयात प्रवेश बंदच्या घोषणा केल्या. मात्र, नाशिकमध्ये पोलिसांनीच या मोहिमेला सुरुंग लावला. पोलीस कर्मचारीच हेल्मेटविना फिरताना दिसले. त्यावरून एका पेट्रोलपंपावर राडा झाला. पोलिसांनी मान खाली घालून धूम ठोकली. इतकेच काय कोरोनाच्या काळातही या निर्बंधाच्या पालनाकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र, आता रुग्ण कमी झाल्यानंतरही पोलिसांनी हे नाहक कागदी घोडे नाचवणए सुरू केल्याने स्वागत समिती आक्रमक झालीय.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?